Type Here to Get Search Results !

चांदूर रेल्वे नगरपरिषद उपाध्यक्षपदी भाजपचे प्रमोद वानरे यांची वर्णी तर स्वीकृत सदस्य म्हणून डॉ निलेश विश्वकर्मा,डॉ सुभाष पनपालीया यांची निवड

 स्थानिक नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची व स्वीकृत सदस्यांची निवड ता 13 मंगळवार रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली,

 यावेळी भाजपाचे नगरसेवक प्रमोद हरगोविंद वानरे,यांची उपाध्यक्ष पदाकरिता निवड करण्यात आली तर स्वीकृत सदस्य म्हणून आपले चांदुर पॅनल चे डॉ निलेश विश्वकर्मा व भाजपा चे डॉ सुभाष पणपालिया यांची निवड झाली,

वीस सदस्य संख्याबळ असलेल्या चांदूर रेल्वे नगरपरिषदेत आपले चांदूर पॅनलच्या प्रा प्रियंका विश्वकर्मा ह्या जनतेतून नगरअध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर भाजपाचे 11 नगरसेवक निवडून आले तर आपले चांदूर पॅनलचे 03 नगरसेवक तर काँग्रेसचे 04 नगरसेवक भाकपा 01 तर अपक्ष म्हणून प्रियंका सतपाल वरठे ह्या निवडून आल्या आहे,स्वीकृत सदस्य करिता आपले चांदूर  पॅनलच्या वतीने निलेश विश्वकर्मा यांनी फॉर्म दाखल केला होता  तर काँग्रेसचे वतीने सतपाल वरठे यांनी फॉर्म दाखल करण्यात आले होते,मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सतपाल वरठे यांचा फॉर्म बाद करण्यात आला, म्हणून स्वीकृत सदस्य पदी डॉ निलेश विश्वकर्मा यांची वर्णी लागली तर भाजपाच्या वतीने डॉ सुभाष पणपालिया यांचा एकमेव फॉर्म दाखल करण्यात आला होता,त्यामुळे ते सुद्धा स्वीकृत सदस्य म्हणून निवडण्यात आले याची ता 13 मंगळवार रोजी मुख्य अधिकारी चांदुर रेल्वे नगरपरिषद यांच्या वतीने बोलवण्यात आलेल्या सभागृहात घोषणा करण्यात आली, यावेळी सर्व नगरसेवका चे नगराध्यक्षिका प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आले,

Post a Comment

0 Comments