Type Here to Get Search Results !

भूमी फाउंडेशनमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

 भूमी फाउंडेशनमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.



पुणे (वाघोली) : स्त्री शिक्षणाच्या जननी, समाजसुधारणेच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या 195 वी जयंतीनिमित्त भूमी फाउंडेशन शेतकरी कन्या निवासी प्रकल्प वाघोली पुणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्यास अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास महिला सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असलेल्या पोलीस विभागातील बीट मार्शल पोलीस श्यामबाला पांडव व पोलीस अंजली नवले,पो.निकिता भापकर, पो.राहुल उगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पोलीस पांडव यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला.महिलांनी शिक्षण,आत्मनिर्भरता व आत्मसन्मान या मूल्यांवर ठाम राहावे,पोलीस अंजली नवले यांनी सांगितले की महिला सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमास भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास पवार यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आपले विचार व्यक्त केले.बीट मार्शल पोलीस रवींद्र उगले यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य हे केवळ इतिहास नसून आजच्या समाजासाठी दिशा देणारे आहे.त्यांच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी भूमी फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू व दुर्लक्षित घटकांतील शेतकरी मुलींसाठी शिक्षण,संरक्षण व सर्वांगीण विकासाचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. प्रकल्प संचालिका अनिता पवार यांनी यावेळी भूमी फाउंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व संस्कारक्षम उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.संस्थेच्या कार्यातून सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवले जात असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी मस्के यांनी अत्यंत प्रभावीपणे केले,तर आभार प्रदर्शन अध्यापिका अनिता पवार यांनी केले.कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी,तसेच आशाताई तांगडे, सविता क्षीरसागर,उज्वलाताई खोबागर्डे आणी प्रकल्प कर्मचारी,निवासी कृषक कन्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प करून करण्यात आला

Post a Comment

0 Comments