सावंगा विठोबा येथे पौष मास अमावस्या निमित्त चंदन उटी व रमणा उत्सव आणि मांड वाढवा कार्यक्रम
चांदुर रेल्वे (प्रतिनिधी):- अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे पौष मास अमावस्या निमित्त चंदन उटी व रमणा तसेच पौष मास मांड वाढवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान यांच्या वतीने दि.१८ जानेवारी २०२६, रविवार रोजी दुपारी ३.३० वाजता संस्थान परिसरात भक्तिभावपूर्ण वातावरणात चंदन उटी व रमणा उत्सव साजरा होणार आहे. या कार्यक्रमानंतर बाहेरगावाहून आलेल्या भाविक भक्तांसह समस्त ग्रामस्थांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन संस्थानच्या अन्नदान समितीच्या नियोजनात करण्यात आले आहे.तसेच, संस्थानतर्फे दि. २० डिसेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत पौष मास निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड जागृती भजन मांड कार्यक्रमाचा वाढवा दि.१९ जानेवारी २०२६, सोमवार रोजी सकाळी ९ वाजता महाराजांचे अर्ज व आरतीने,विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत भजनाचे गजरात संपन्न होणार आहे.
या वर्षीचा गुढीपाडवा यात्रा महोत्सवाचे सुयोग्य नियोजनाचे दृष्टीने पूर्व तयारी म्हणून विश्वस्त मंडळाची सामान्य सभा संपन्न झाली आहे
भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नियमित बससेवा उपलब्ध असून,चांदुर रेल्वे बसस्थानकातून सकाळी ९.००, १०.००,दुपारी ३.००,व सायंकाळी ७.१५ वाजता तर अमरावती बसस्थानकातून सकाळी ७.३० वाजता व सायंकाळी ५.४५ वाजता बससेवा सुरू आहे. भाविकांनी अवैध वाहनांचा वापर न करता अधिकृत बससेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविक–भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल आणि विश्वस्त विनायक पाटील, वामण रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड,चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



Post a Comment
0 Comments