Type Here to Get Search Results !

घुईखेड येथे श्री. संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा सोमवारपासुन ,समाधी महोत्सवाचे ६८९ वे वर्षसंस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांची पत्रकार परिषदेतून माहिती...

 घुईखेड येथे श्री. संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा सोमवारपासुन ,समाधी महोत्सवाचे ६८९ वे वर्षसंस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांची पत्रकार परिषदेतून माहिती...



२६ जानेवारीला शोभायात्रा, दहिहांडी, महाप्रसाद


चांदूर रेल्वे - (ता. प्र.) 


        चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्रसिध्द श्री. संत बेंडोजी महाराज यांचे संजिवन समाधी सोहळ्याला यावर्षी उद्या १९ जानेवारी सोमवारपासुन सुरूवात होणार असुन 30 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. याबाबतची माहिती संस्थानचे विश्वस्त प्रविण घुईखेडकर यांनी चांदूर रेल्वे येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी नंदकिशोर काकडे, गजानन फिस्के, कैलास सावनकर यांची उपस्थिती होती. २६ जानेवारीला काल्याने किर्तन, शोभायात्रा, दहिहांडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दहिहांडीचा कार्यक्रम होताच यात्रा महोत्सवाला सुरूवात होणार आहे.



संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आणि विदर्भातील एकमेव संजिवन समाधी असलेले श्री संत बेंडोजी महाराज यांनी संजिवन समाधी घेतली होती. इ.स. १३३७ पासुन बेंडोजी महाराजांचा संजिवन समाधी सोहळा सुरू आहे. या सोहळ्याचे यंदा ६८९ वे वर्ष असुन आता सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. सोमवार १९ जानेवारीला श्री संत बेंडोजी महाराज मंदिरात तिर्थ स्थापना, कलश स्थापना, अभिषेक, लघुरूद्राभिषेक संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर तसेच दिनकर घुईखेडकर व शशिकांत चौधरी सह पत्नी यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर शुभांगी व संजय कुचेवार (मुंबई) यांच्या हस्ते संगीतमय शिवपुराण कलश स्थापना व पुजन होणार आहे.  संगीतमय शिवपुराण कथा  प्रवक्ता विदर्भ कन्या ह.भ.प. वैभवश्रीजी पांडे (वृंदावन) ह्या राहणार असुन सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ वाजतापर्यंत शिवपुराण कथा होणार आहे. तसेच दररोज सकाळी ५ ते ६ वाजता सामुदायीक प्रार्थना, काकडा आरती, ग्राम सफाई व गावातून फेरी काढण्यात येणार आहे. तर सकाळी ८  वाजता आरती, श्री बेंडोजी बाबा ग्रंथाचे पारायण वाचन ह.भ.प. निवृत्तीनाथ गोळे (बग्गी) हे करणार आहे. या आठ दिवसात वेगवेगळे किर्तनकार रोज किर्तन करणार असुन भजनाचा कार्यक्रम सुध्दा विविध मंडळांमार्फत आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान दररोज विविध अन्नदाते अन्नदान करणार आहे.


२६ जानेवारी रोजी दुपारी ११ ते २ च्या दरम्यान ह.भ.प. उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन कालावाटप होणार आहे. तर सायंकाळी ४ वाजता गोपालकाला, दहिहांडी आणि सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार असून 30 जानेवारीला गोत आंबील महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवादरम्यान लवकरच जंगी शंकरपटाचेही आयोजन  घुईखेडमध्ये करण्यात येणार असुन याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, विश्वस्त प्रविण घुईखेडकर, राजाभाऊ चौधरी व इतरांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments