संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर : पात्रीकर कॉलनीत कुणबी समाज मेळावा व व्याख्यान सेवा कार्यक्रम संपन्न
चांदूर रेल्वे
येथील पात्रीकर कॉलनी सभागृह मंदिरात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सकल कुणबी उद्योग व सामाजिक संस्था, चांदूर रेल्वे यांच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जयंती निमित्त कुणबी समाज मेळावा व व्याख्यान सेवा कार्यक्रमाचे आयोजन २३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. समाजातील एकोपा, संस्कार आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक मांडताना संस्थेचे उद्देश काय याची माहिती देत सांगण्यात आले की आजही 60% कुणबी समाज हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे शेतीबरोबरच आजच्या काळात नोकरीपेक्षा उद्योग फार महत्त्वाचा असून शेतीला जोड कोणताही एक उद्योग करावा समाजातील काही मोठ्या मंडळींनी मार्गदर्शन करून होतकरू पोरांना उद्योगाचे मार्गदर्शन करावे हे आग्रहाने अमोल ठाकरे यांनी प्रास्ताविकामध्ये मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश जगताप होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कुणबी समाज मेळावा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्याख्याते म्हणून
प्रा विश्वास धावडे सर आणि प्राध्यापक सारंग धावडे सर अमरावती यांनी आपल्या मार्गदर्शनातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला कसे प्रेरणादायी आहे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जगत असलेल्या दिनचर्यामध्ये महाराजांनी आपल्या अभंगातून प्रत्येक वेळेस प्रेरणा देण्याचे काम केले आहे असे सांगत आपल्या समाजाला एकत्र येण्याची गरज असून ती एकता विकासात्मक असली पाहिजे एकमेकाचा विकास करून एकमेकांच्या सोबत सुखदुःखात असणारी असली पाहिजे तसेच मेळाव्यात संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील सामाजिक समता, कष्टाचे महत्त्व व नैतिक मूल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच सोबत अतिथी आणि जेष्ठ मार्गदर्शक म्हणून पांडुरंगजी इंगोले अमरावती यांनी मार्गदर्शन केले तसेच आयोजन समितीतील जितेंद्र गोरे,प्रसन्न पाटील, डॉ सागर वाघ, केशव बोदडे, स्वामीप्रसाद वानखडे,जयंत शेळके, प्रशांत कातोरे,स्वप्निल मानकर, रुपेश पुडके, शैलेश डाफ, संतोष ठाकरे, गोविंद कातोरे, अविनाश कैलकार तसेच अपर्णा जगताप, नीता कडू, कदम ताई, डुबे ताई, गोरे ताई, झाडे ताई यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कुणबी समाज मेळाव्यास परिसरातील समाजबांधव, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ प्रियंका ठाकरे यांनी मानले व समारोपप्रसंगी आयोजकांच्या वतीने सुद्धा उपस्थितांचे आभार मानण्यात आले.




Post a Comment
0 Comments