Type Here to Get Search Results !

श्री संत एकनाथ महाराज यात्रेनिमित्त२ फेब्रुवारीला आमला विश्वेश्वर येथे विभागस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा १ लाख ११ हजार १११ रूपयांची बक्षिसांची लयलूट

 श्री संत एकनाथ महाराज यात्रेनिमित्त२ फेब्रुवारीला आमला विश्वेश्वर येथे विभागस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा १ लाख ११ हजार १११ रूपयांची बक्षिसांची लयलूट



सर्वाेत्कृष्ट कुस्तीपटूला चांदीची गदा 


तालुका प्रतिनिधी/


चांदूर रेल्वे-


श्री संत एकनाथ महाराज जयंतीनिमित्त आयुष बे.यु.ना.सेवा सहकारी संस्था,आमला विश्वेश्वर व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती यांच्या सहयोगाने स्व.अन्नाजी उर्फ शेषराव डेरे व स्व.दादासाहेब सोनारकर स्मृति प्रित्यर्थ विभागस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा चे

आयोजन २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आमला विश्वेश्वर येथील श्री संत एकनाथ महाराज तिर्थक्षेत्र प्रांगणावर आयोजित केले असुन विजेत्या पहेलवानावर १ लाख ११ हजार १११ रूपयांची बक्षिसांची लयलूट होणार आहे.



स्व.भुजंगराव डहाके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अमोल डहाके यांच्या तर्फे सर्वाेत्कृष्ट कुस्तीपटूला चांदीची गदा देण्यात येणार आहे. तसेच स्व नामदेवराव सोनारकर,स्व.अण्णाजी उर्फ शेषराव डेरे,स्व.मोतीराम गोफणे,स्व.विठ्ठलराव बनसोड,स्व.पांडुरंग अनासने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मनोज सोनारकर,राजु डेरे ज्ञानेश्वर गोफणे,अरविंद बनसोड,दीपक अनासने यांच्यावतीने विजेत्या पहेलवान यांना १ लाख ११ हजार १११ रूपयाचे बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच अशोक डोंगरे,नारायण बकाले,प्रभाकर भगत, रूपेश पोलाड यांच्यावतीने सर्व कुस्ती पहेलवान यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहे.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार तथा विदर्भ कुस्ती महासंघाचे अध्यक्ष रामदास तडस च प्रमुख अतिथी म्हणून चांदूर रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समितीचे धान्य व्यापारी अनिल गावंडे,कोल्हापूर येथील कुस्तीमध्ये प्रथम पारितोषीक पटकविणारे अरविंद पोलाड,डाॅ.प्रभाकर खेरडे,उत्तमराव खेकडे,डाॅ.गणेश बनसोड,संजय केने,भगवान वाघ,पहेलवान शेषराव बनकर,माजी पं.स.सदस्य देवराव भटकर,दत्तात्रय दुबे,श्रीकृष्ण उईके,महादेव हेरोडे,धामणगाव रेल्वे सुत गिरणीचे संचालक अरविंद बकाले,आनंद सहारे,विनायक डांगे, अशोक डोेंगरे,भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वप्निल भुयार,नरेंद्र नाल्हे,डाॅ.प्रशांत वाढोणकर यांवी उपस्थिती राहणार आहे.यावेळी माजी सैनिक दिगांबर सुपटकर,माजी सैनिक यांची पत्नी शोभा मनोहर बकाले, माजी सेनिक पत्नी आशा मुरलीधर नेरकर,अर्चना मनोहर नागोसे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला चांदूर बाजाराचे नायब तहसिलदार मनोज सोनारकर,जिल्हा शिक्षक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अरविंद बनसोड,जेष्ठ नागरिक नारायण बकाले,अमोल डाहाके,दीपक अनासने, रूपेश पोलाड,प्रभाकर भगत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कुस्ती स्पर्धेला मोठया संख्येने उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे संयोजक प्रा.डाॅ.संजय तिरथकर,मुख्य आयोजक राजेंद्र डेरे,राजेश गोफणे यांसह गावकऱ्यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments