Type Here to Get Search Results !

आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील अभूतपूर्व कार्य करणाऱ्या दिग्गजांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला..

 आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील अभूतपूर्व कार्य करणाऱ्या दिग्गजांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला.                             


अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथील अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनंतर बोथी गुरुजी यांनी राष्ट्र संतांच्या आश्रमाची धुरा सांभाळली. राष्ट्रसंतांचा विचार तळागाळात पोहोचवण्यात बोथे गुरुजींच मोलाच योगदान राहिलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमाचं भव्य निर्माण, तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, जयंती महोत्सव जागतिक पटलावर घेऊन जाण्यात त्यांनी मोठं काम केलं आहे. 


विदर्भातील सर्वात मोठे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासोबत जनार्दनपंथ बोथे गुरुजी यांचा सहवास राहिला आहे. या पुरस्कारामुळे अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यावेळी बोथे म्हणाले, हा पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा सन्मान आहे. हा सन्मान मी राष्ट्र तुकडोजी महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. तुकडोजी महाराज यांना मानणाऱ्या देशभरातील सर्व गुरुदेव भक्तांचा हा सन्मान आहे.

Post a Comment

0 Comments