*चांदुररेल्वे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात*
*विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू*
*इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेल्या व 8 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत*
अमरावती, चांदूर रेल्वे येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
चांदूर रेल्वे बस डेपोच्या मागील परिसरात असलेल्या या शासकीय वसतिगृहात इयत्ता 8 वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन आणि अभ्यासिकेची उत्तम सोय पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाते. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून, इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेल्या व 8 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत आहे.
तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 15 जुलै 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले ऑनलाईन अर्ज मुदतीपूर्वी सादर करावेत. ग्रामीण व गरजू भागातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या शासकीय योजनेचा आणि मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
00000000
Post a Comment
0 Comments